E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
एलॉन मस्क यांनी मोठी चूक केली
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचा इशारा
वॉशिंग्टन : टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी प्रतिक्रिया दिली आहे.अमेरिकेच्या अध्यक्षांना लक्ष्य करून मस्क हे मोठी चूक करत असल्याचे व्हान्स यांनी म्हटले आहे.
मस्क यांनी म्हटले, की माझ्याशिवाय ट्रम्प निवडून आले नसते, तसेच जेफ्री एपस्टाईनला अमेरिकेत लैंगिक गुन्हेगार म्हणून दोषी ठरवण्यात आले होते, या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव असल्याचा गंभीर आरोप मस्क यांनी केला. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक पोस्टही केली होती. मात्र, यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाल्यानंतर मस्क यांनी ही पोस्ट हटवली. एवढेच नाही तर त्यानंतर त्यांनी थेट नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत संकेत दिले.
मस्क यांच्याबरोबरचे नाते संपल्याचे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा इशारा दिला. मस्क यांना खूप गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले. दरम्यान, त्यानंतर या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांना लक्ष्य करून मस्क हे मोठी चूक करत असल्याचे जेडी व्हान्स यांनी म्हटले आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत मस्क यांनी केलेल्या एका पोस्टचा संदर्भ देत जेडी व्हान्स यांनी म्हटले, की त्यांनी आपला संयम गमावला आहे. पण मला वाटते की मस्क यांनी थोडे शांततेने घेतले तर सगळे ठीक होईल. अध्यक्षांना अशा प्रकारे बोलणे किंवा विरोधात जाणे ही त्यांची खूप मोठी चूक आहे. हे देशासाठी वाईट आहे. मला आशा आहे की मस्क पुन्हा सरकारबरोबर येतील, असे एका मुलाखतीत बोलताना जेडी व्हान्स यांनी नमूद केले.
मस्क यांच्या बरोबरचे नाते संपले : ट्रम्प
एका मुलाखतीत बोलताना ट्रम्प यांनी म्हटले, की ‘हो आमचे संबंध संपुष्टात आले असे मी आता गृहीत धरतो,’ तसेच मस्क यांच्याबरोबरचे संबंध सुधारण्याची आता कोणतीही इच्छा नाही आणि मस्क यांनी आगामी मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट्सना मदत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांना दिला.
नवीन राजकीय पक्ष काढणार?
ट्रम्प यांच्याशी सुरू असलेल्या वादानंतर आता मस्क यांनी थेट राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. मस्क यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट शेअर करत पोस्टमध्ये त्यांनी जनतेचा पोल घेतला. त्यामध्ये मस्क यांनी असे म्हटले, की अमेरिकेत ८० टक्के मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची वेळ आली आहे का?, तसेच या प्रश्नावर अगदी ८० टक्के नागरिक सहमत असल्याचा दावाही त्यांनी केला. याबरोबरच ही पोस्ट शेअर करत द अमेरिका पार्टी असे सूचक नवीन नावही त्यात सूचवले. इलॉन मस्क यांच्या या पोस्टमुळे ते नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या विचारात आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Related
Articles
महेंद्रसिंह धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नामांकन
14 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
भारताची लोकसंख्या १.४६ अब्जाजवळ
11 Jun 2025
महेंद्रसिंह धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नामांकन
14 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
भारताची लोकसंख्या १.४६ अब्जाजवळ
11 Jun 2025
महेंद्रसिंह धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नामांकन
14 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
भारताची लोकसंख्या १.४६ अब्जाजवळ
11 Jun 2025
महेंद्रसिंह धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नामांकन
14 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
भारताची लोकसंख्या १.४६ अब्जाजवळ
11 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक